Manufacturer of Isolators / Stockiest of Over Head Line Materials / Govt Contractors.

Balaji Engineers - Manufacturer of Electrical Equipments and Government Licensed Electrical Contractor in  Maharashtra, Karnataka, Goa, India
  • Behind Kolhapur Axle,

  • M.I.D.C., Shiroli, Kolhapur

Balaji Engineers - Manufacturer of Electrical Equipments and Government Licensed Electrical Contractor in  Maharashtra, Karnataka, Goa, India

इलेक्ट्रिकल कंडक्टर कोणता व कसा निवडावा...

कंडक्टरचे काम हे इलेक्ट्रिक पावर एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी वाहून नेणे असे असते.

इलेक्ट्रिकल कंडक्टर कोणता व कसा निवडावा

चला करु सुरवात

इलेक्ट्रिकल कंडक्टर कोणता व कसा निवडावा

बरेच अशे धातु आहेत की ज्यांची कंडक्टिविटी खूप जास्त आहे. गोल्ड, सिल्व्हर हे त्याच पैकी आहेत पण गोल्ड, सिल्व्हर यांचा विद्युत सिस्टम्समध्ये वायरसाठी वापर करणे शक्य नाही, कारण ते खूपच महाग आहेत किमतीने.

इलेक्ट्रिकल कंडक्टर कोणता व कसा निवडावा

या कारणास्तव, सेरतेशेवटी आपल्याकडे तांबे (Copper) आणि Aluminum ही दोन धातूंच उपयोगात आणण्यासारखे दिसून येतात. यात पण ज्यावेळी खूप प्रमाणात वापर करायचा झाल्यास आजपण Aluminum चा सर्रास कंडक्टर म्हणून वापर होतो.

आता थोडक्यात Aluminum कंडक्टर कसा सरस आहे कॉपर च्या ऐवजी....

वजन

Aluminum कंडक्टर हा कॉपर कंडक्टर च्या मानाने वजना मध्ये खूप हलका असतो , जर एका विशिष्ट लांबीचे कॉपर चे वजन जर 1 किलो असेल तर त्याच लांबीचे Aluminum कंडक्टर हे 600 ग्राम इतके वजनाचे असते, यामुळे आपल्याला Transmission चे खांब (Tower ) आहेत ते फार आति मजबूत आणि जास्त मटेरियल ने बनवलेले वापरायची गरज नाही . तुलनाम्तक रित्या कॉपर कंडक्टर ला हे Structure फार हेव्ही करायला लागेल, कारण आहे त्याचे वजन..... अंततः असा निष्कर्ष काढता येईल कि Transmission Tower Structure ची कॉस्ट कमी येऊन आपली आर्थिक बचत होईल जर आपण अलुमिनिअम कंडक्टर वापरात आणला तर …

किंमत

Aluminum चा सर्रास कंडक्टर म्हणून वापर होतो त्याचे आजून एक कारण आहे ते म्हणजे त्याची किंमत, सध्या साधारणपणे कॉपर ची 1 किलो ची बाजारातील किंमत 550 Rs आहे तर च्याच ठिकाणी Aluminum ची किंमत 220 Rs आहे ,निष्कर्षात असे दिसते कि 50% कमी दरामध्ये Aluminum उपलब्द आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात याचा वापर करणे सोयीस्कर जाते.

इलेक्ट्रिकल कंडक्टर कोणता व कसा निवडावा

लॉंग लाईफ

मुख्यतः Aluminum हे जास्त लाईफ कव्हर करते, Transmission कंडक्टर वर आपण पहिले असेल कि इन्सुलेशन हे नसते त्यामुळे थेट सम्पर्क हा वातावरणाशी येतो, कॉपर ला पहिले तर थोड्या दिवसांनी गंज (Corrosion) लागतो. आपण पहिले असेल की घरातील कॉपर च्या भांड्यांचा कलर सुद्धा बदलतो वातावरणामुळे म्हणून कॉपर उत्तम पर्याय होऊ शकत नाही, या उलट Aluminum हे दीर्घकाळ टिकते सर्वसाधारणपणे १०० वर्षे.

इलेक्ट्रिकल कंडक्टर कोणता व कसा निवडावा

आता पाहु कंडक्टर चे विविध प्रकार (Types of Transmission Line Conductor)

Solid Conductor (सॉलिड कंडक्टर)

याचा उपयोग इलेक्ट्रिक पॉवर सबस्टेशन बस मध्ये केला जातो, कमी अंतराच्या बस (Substation BUS)मध्ये याचा वापर केला जातो. मोठ्या अंतरासाठी वापरला जात नाही.

इलेक्ट्रिकल कंडक्टर कोणता व कसा निवडावा

Hollow Conductor (होलो कंडक्टर)

याचा उपयोग देखील इलेक्ट्रिक पॉवर सबस्टेशन मध्येच केला जातो , कमी अंतराच्या बस (Substation BUS) मध्ये याचा वापर केला जातो याच्या आकारामूळे याची करंट कॅररिंग कपॅसिटी चांगली असते तसेच याची कुलिंग कॅपॅसिटी सुद्धा खुप चांगली असते .

इलेक्ट्रिकल कंडक्टर कोणता व कसा निवडावा

Standard Conductor

हे पातळ वायरने बनलेले असतात, ज्यामुळे ते सहजपणे दुमडले जाऊ शकतात. आणि त्यांना रोलमध्ये लपेटून सहजपणे एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी पाठविले जाऊ शकते.

इलेक्ट्रिकल कंडक्टर कोणता व कसा निवडावा

AAC (All Aluminum Conductor)

याच्या नावावरुनच लक्षात येते की या मध्ये सर्व Strands (पंतें ) हे Aluminum आसतात, Aluminum असलेने यावर गंजाची (Corrosion) प्रक्रिया होत नाही म्हणुन याचा वापर हा जास्त पाऊस असलेल्या क्षेत्रात तसेच सुमुद्र किनाऱ्या लगत केला जातो.

इलेक्ट्रिकल कंडक्टर कोणता व कसा निवडावा

AAAC (All Aluminum Alloy Conductor)

AAAC वायर मधील सर्व तारा देखील Aluminum पासुन बनविल्या जातात, परंतु Aluminum जास्त लवचिक असल्याने याच्या मध्ये काही धातु मिसळले जातात. ज्यामुळे त्यांची शक्ती वाढविली जाते. याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो AAC कंडक्टर पेक्षा. हा कंडक्टर नेहमी LT LINE करता वापरात येतो. शहरी भाग, ग्रामीण भाग तसेच कृषिक वापराच्या लाइन्स करता याचा उपयोग होतो, याला 34 mm2 AAAC कंडक्टर असे सुद्धा म्हणतात.

इलेक्ट्रिकल कंडक्टर कोणता व कसा निवडावा

ACSR (Aluminum Conductor Steel Reinforced)

हा सर्वात सामान्यपणे अधिक प्रमाणात वापरला जाणारा Aluminum Conductor आहे. त्यामधील वायरमध्ये गॅल्वनाइज्ड स्टील (Galvanized Steel Wire)असते. ज्यामुळे ACSR कंडक्टरची मजबुती (Mechanical Strength) मोठ्या प्रमाणात वाढते.

या कंडक्टरमध्ये स्टीलच्या वापरामुळे गरम झाल्यावर ते फारसे पसरत (Expand) नाही. या कारणास्तव जिथे आंतर जास्त प्रमाणात आहे तिथे हा कंडक्टर वापरला जातो, तसेच दोन विद्युत खांबामधील जास्त अंतरासाठी सुद्धा याचा वापर करता येतो. ACSR कंडक्टर हा दोन्ही उच्च व्होल्टेज लाइन (HT LINE ) आणि LT LINE वर वापरला जातो.

चला आता पाहु ACSR कंडक्टर.... Type Of ACSR Transmission Line Conductor

Weasel Conductor ( 30 mm2 )

यात मध्ये 6 अ‍ॅल्युमिनियमचे स्ट्रेन्ड आणि 1 स्टीलचे स्ट्रेन्ड असते . त्याची वहन क्षमता (Current Carring Capacity ) 144 Amp (अँपिअर ) पर्यंत आहे. Weasel कंडक्टर हा LT LINE / H T LINE करता वापरला जातो , मध्यम ते लांब पल्ल्याच्या LT LINE साठी हा कंडक्टर उपयुक्त ठरतो . हा कंडक्टर १ /२/५/१० KM च्या पॅकिंग मध्ये बाजारामध्ये उपलब्ध असतो.

इलेक्ट्रिकल कंडक्टर कोणता व कसा निवडावा

RABBIT Conductor ( 50 mm2 )

या मध्ये सुद्धा 6 अ‍ॅल्युमिनियमचे स्ट्रेन्ड आणि 1 स्टीलचे स्ट्रेन्ड असते पण या कंडक्टर चा आकार हा Weasel Conductor च्या पेक्षा जास्त असतो कारण यामध्ये असणाऱ्या स्ट्रेन्ड (पंता ) याचे आकारमान जास्त असते . याची वहन क्षमता (Current Carrying Capacity) 157 Amp (अँपिअर ) पर्यंत असते . हा कंडक्टर नॉर्मली HT LINE करता वापरला जातो 11 kV , 22 kV voltage lines यावर कव्हर होतात.

इलेक्ट्रिकल कंडक्टर कोणता व कसा निवडावा

DOG Conductor (100 MM २)

11 केव्ही, 33 केव्ही ते 66 केव्ही पर्यंत वापरात असलेल्या कंडक्टरला DOG Conductor म्हणतात. त्याची वहन क्षमता (Current Carrying Capacity ) 300 Amp (अँपिअर ) पर्यंत आहे. यात सर्वसाधारणपणे 6 अ‍ॅल्युमिनियमचे स्ट्रेन्ड आणि 7 स्टीलचे स्ट्रेन्ड असतात. लांब पल्ल्याच्या सलग ३३ kV लाईन्स साठी तसेच पिन टाईप / सस्पेन्शन टाईप लाईन इत्यादी साठी या कंडक्टर चा उपयोग होतो.

इलेक्ट्रिकल कंडक्टर कोणता व कसा निवडावा

Panther पँथर Conductor (200 MM २)

हा Conductor 33 kV च्या Gantry BUS वर्क साठी तसेच 66 kV व्होल्टेज पासून ते 132 kV व्होल्टेज लेव्हल पर्यंत वापरला जातो . याची अँपिअर कॅपॅसिटी 480 आहे , या मध्ये 30 अ‍ॅल्युमिनियमचे स्ट्रेन्ड आणि 7 स्टीलचे स्ट्रेन्ड चा समावेश असतो. याचा देखील Sub Station मधील BUS साठी उपयोग होतो.

Sub Station मध्ये वेगवेगळे Feeders (फीडर्स ) या बस कंडक्टर ला जोडले असतात.

इलेक्ट्रिकल कंडक्टर कोणता व कसा निवडावा

Zebra झेब्रा Conductor 420 mm2

220 kV व्होल्टेजसाठी झेब्रा कंडक्टर वापरला जातो. याची कॅपॅसिटी 735 अँपेअर पर्यंत जाऊ शकते. झेब्रा कंडक्टरमध्ये 54 अ‍ॅल्युमिनियमच्या आणि 7 स्टीलचे स्ट्रेन्ड असतात. EHV (Extra High Voltage ) साठी हा कंडक्टर वापरात येतो.

इलेक्ट्रिकल कंडक्टर कोणता व कसा निवडावा

Moose Conductor 520 mm2

हा कंडक्टर 220 kV तसेच 400 kV व्होल्टेजच्या Transmission Lines साठी वापरला जातो याची Current Carring Capacity 800 एम्पीयर पर्यंतचे प्रवाह सहजपणे सहन करण्याची असु शकते.

यात झेब्रा कंडक्टरसारखेच 54 एल्युमिनियम व 7 स्टीलचे स्ट्रेन्ड आसतात पण Moose कंडक्टर हा जोडीने जास्त असतो Zebra कंडक्टर पेक्षा... या कारणास्तव ते झेब्रा कंडक्टरपेक्षा अधिक प्रमाणात करंट कॅरी करू शकतो

इलेक्ट्रिकल कंडक्टर कोणता व कसा निवडावा

आता नवीन टेकनॉलॉजिचे ACSS Conductor ( Aluminium Conductor Steel Supported ) आणि ACCR Conductor ( Aluminium Composite Core Reinforce ) उपलब्द होत आहेत ज्या मध्ये जास्त करंट कॅरिंग कॅपॅसिटी, हलके वजन, जास्त गरम न होण्याची कॅपॅसिटी, जास्त लाईफ इत्यादी महत्वाची गुणधर्मे आहेत.

इलेक्ट्रिकल कंडक्टर कोणता व कसा निवडावा

Technical Specification of AAC, AAAC and ACSR Conductor

Sr. No. Name of Conductor Area MM2 Current Carrying
Capacity (AMP)
Weight Kg
Per Kilo Meter (KM)
1 AAC Gant Conductor 25 120 74
2 AAC ANT Conductor  50 189 145
3 AAAC 34sqmm Conductor  34 155 94
4 ACSR Weasal Conductor  30 170 128
5 ACSR Racoon Conductor  80 300 318
6 ACSR 0.1 Dog ​ Conductor  100 360 394
7 ACSR Panther Conductor 200 560 974
8 ACSR Zebra Conductor 420 860 1622

For More Technical Specification of Conductor Please Visit

https://www.balajiengineers.in/overhead-line-material-conductor.php

Our Products

Services We Offer

We Deal In

Dealer Supplier Huphen Kolhapur
Dealer Supplier Huphen Kolhapur
Dealer Supplier Polycab Wires Cables Kolhapur
Dealer Supplier Kolhapur
Dealer Supplier Raychem RPG Kolhapur
Dealer Supplier Bajaj
Dealer Supplier Crompton Greaves
Dealer Supplier ABB Kolhapur
Dealer Supplier Manisha Engineering Pvt Ltd. Kolhapur
Dealer Supplier Kirloskar Kolhapur
Dealer Supplier Huphen Kolhapur
Dealer Supplier Finolex Kolhapur
Dealer Supplier JVS Electronics Kolhapur
Dealer Supplier DG Kolhapur
Dealer Supplier Atlanta Electrical Kolhapur
Dealer Supplier Densons Kolhapur
Dealer Supplier HTS Kolhapur
Dealer Supplier Elster Kolhapur
Dealer Supplier DG Kolhapur
Dealer Supplier Atlanta Electrical Kolhapur
Dealer Supplier Densons Kolhapur