How to Improve Power Factor In Industry
आपल्या सगळ्यांना गरम मस्त कॉफी प्यायला आवडते ...
पण समजा हॉटेलमालकानी पूर्ण पैसे घेऊन आर्धी कॉफी आणि आर्धा फेस दिला तर...
नक्कीच आपला हिरमोड होणार ....
आपल्या पॉवर फॅक्टर चे पण तसेच आहे, समजा आपण पूर्ण पैसे देऊन त्या मानाने कमी वीज घेतली तर नक्कीच तोट्याला सामोरे जावे लागणार,
पॉवर फॅक्टर म्हणजे वोल्टेज आणि करंट मधील फरक हे आपण मागील ब्लॉग मध्ये पहिले आहेच ,
आत्ता पाहू पॉवर फॅक्टर कसा IMPROVE करायचा तो
१) योग्य प्रमाणात आणि योग्य कॅपेसिटी चे कपॅसिटर वापरून
२) जास्त EFFICIENT मोटर्स, ज्यांचा पॉवर फॅक्टर जास्त आहे अश्या मोटर्स वापरून,
३) इलेक्ट्रिकल EQUIPMENT’S ची निवड करताना ते योग्य कॅपॅसिटी चे आहेत का याची खात्री करून.
४) लाइटिंग लोड ला सेपरेट कॅपॅसिटर वापरता येते का ते पाहुन.
५) वेल्डिंग मशीन ,लहान मोठ्या सर्व मोटर्स,इ. कपॅसिटर च्या सर्किट मध्ये आणून.
योग्य प्रमाणात आणि योग्य कॅपेसिटी चे कपॅसिटर वापरून
आपण आपल्या इंडस्ट्री मधील पॉवर फॅक्टर हा योग्य प्रमाणात आणि योग्य कॅपेसिटी चे कपॅसिटर वापरून कमी करू शकतो,
आपल्या इंडस्ट्री मधील लोड हा सतत कमी जास्त होत असतो अश्या वेळी आपण म्यानुली कपॅसिटर ON /OFF करून पॉवर फॅक्टर कंन्ट्रोल करणे शक्य नसते,