पॉवर फॅक्टर चे फायदे तोटे

मि. सुखी VS मि दुःखी यांच्या उदाहरणा वरून समजून घेऊ ..

मि.सुखी व मि.दुःखी यांना समजा ५०० KW लोड असणाऱ्या कारखान्यात नवीन ट्रान्सफॉर्मर किंवा DG SET (डिझेल जनरेटर ) लागणार आहे ,

असे समजु की, मि.सुखी हा चांगला पॉवर फॅक्टर असणारा म्हणजे १.० (युनिटी पॉवर फॅक्टर ) चा लोड जोडणार आहे .

काय होते ते पाहू ,

500 KW / 1.0 (P F) = ५०० KVA,

५०० KVA चा ट्रान्सफॉर्मर बसवावा लागेल

advantages and disadvantages of power factor

आता असे समजु की, मि.दुःखी हा खराब पॉवर फॅक्टर असणारा म्हणजे ०.८ PF वैगरे चा लोड जोडणार आहे.

काय होते ते पाहू ,

500KW / 0.8 (P F) (P F) = 625 KVA,

म्हणजेच 630 KVA ट्रान्सफॉर्मर लागेल.

advantages disadvantages of of power factor

निष्कर्ष

अश्या प्रमाणे येणारे उत्तर हे मि. सुखी ला KVA हे कमी आले आणि मि.दुःखी ते जास्त आले , या वरून हे असे लक्षात येते कि ज्या ठिकाणी खराब पॉवर फॅक्टर चा लोड जोडला असेल तर त्या ठिकाणी KVA रेटिंग वाढते व आणावे लागणारे Equipments हे जास्त (Higher) कॅपॅसिटीचे आणावे लागणार, त्यामुळे मि. दुःखी वर आर्थिक बर्डन वाढणार व याच्या उलट मि .सुखी कडून योग्य ती Equipments आणले जातील आणि त्याचा आवश्यक खर्च हा वाचला जाईल.

advantages and disadvantages of power factor

२ नं. चा तोटा म्हणजे, विनाकारण कंडक्टर किंवा केबल ही मोठया साईझ ची लागेल

मि.सुखी व मि.दुःखी यांना समजा सिंगल फेज 10 KW लोड असणारी मोटार कारखान्यात लागणार आहे,

पुन्हा असे समजु की, मि. सुखी हा चांगला पॉवर फॅक्टर असणारा म्हणजे १.० (युनिटी पॉवर फॅक्टर) चा मोटर ला जोडणार आहे.

I = P (W T) / V X PF तर,
10 X 1000 / 220 X 1. 0 = 10000 / 220
= 45. 45 अम्पियर

advantages and disadvantages of power factor

असे समजु की, मि.दुःखी हा खराब पॉवर फॅक्टर असणारा म्हणजे 0.8 चा लोड मोटर ला जोडणार आहे

I = P (W T) / V X PF तर,
10 X 1000 / 220 X 0.8 = 10000 / 176
= 56.81 अम्पियर

advantages and disadvantages of power factor

निष्कर्ष

अश्या प्रमाणे येणारे उत्तर हे मि .सुखी ला अम्पियर हे कमी आले आणि मि.दुःखी ते जास्त आले , या वरून हे असे लक्षात येते कि ज्या ठिकाणी खराब पॉवर फॅक्टर चा लोड जोडला असेल तर त्या ठिकाणी अम्पियर कॅपेसिटी वाढते व बसवावे लागणारे कंडक्टर तसेच केबल हे जास्त (Higher )अम्पियर कॅपॅसिटीचे आणावे लागणार , त्यामुळे मि . दुःखी ह्याला आर्थिक फटका बसणार याच्या उलट मि .सुखी कडून योग्य अम्पियर कॅपॅसिटीचे आणले जातील आणि त्याचा आवश्यक खर्च हा वाचला जाऊन फायद्यात वाढच वाढ होईल

advantages and disadvantages of power factor

३ नं. चा आणि सगळ्यात मोठा तोटा म्हणजे खराब पॉवर फॅक्टर ला वीज वितरण कंपनी दंड ठोठावते. (पेलेन्टी आकारते)

दोन कारखान्याच्या उदाहरण वरून समजू, त्यातील एका कारखान्याचा पॉवर फॅक्टर ०. ८ (खराब ) आहे आणि दुसऱ्या कंपनीचा १. ० (युनिटी ) पॉवर फॅक्टर आहे .

advantages and disadvantages of power factor

वीज वितरण कंपनी, ज्या वेळी १० KW लोड व (१.० PF ) असणाऱ्या कंपनीला वीज वितरित करीत असेल तेंव्हा त्यांना ४५ अम्पियर तर खराब पॉवर फॅक्टर ०. ८असणाऱ्या कंपनी ला या ठिकाणी ५७ अम्पियर करन्ट पाठवावा लागतो ( सम्पूर्ण लोड १० KW हा समान असला तरीही), सहाजिकच खराब पॉवर फॅक्टर असणाऱ्या फॅक्टरी ला लोड देण्यासाठी त्यांना त्यामानाने विजेचे जनरेशन जास्त करावे लागेल याच बरोबर जास्त कॅपॅसिटी चे विदुत साहित्य वापरावे लागेल , या साठीच वीज वितरण कंपनी ही खराब पॉवर फॅक्टर वापरणाऱ्या कंपनीना पेलेन्टी लावते.

तोटा नं. ४. Equipment ची लो लाईफ (कमी जीवनमान)

advantages and disadvantages of power factor

जेव्हा 10 KW लोड असणाऱ्या दोन मोटर्स पण ज्यांचा पॉवर फॅक्टर 1.0 व 0.8 असेल त्या ठिकाणी, 0.8 ज्या ठिकाणी पॉवर फॅक्टर आहे त्या मोटर ला 57 अम्पियर करंट लागेल ज्यामुळे त्याचे कालान्तराने होणारे (मोटर च्या कॉईल इन्सुलेशन वीक होईल इ .) नुकसान हे लवकर तसेच जास्त प्रमाणात होईल .,तुलनात्मक द्रिष्टया ज्या मोटर चा पॉवर फॅक्टर 1.0 आहे व लागणारा कर्रंट हा 45 अम्पियर आहे त्याचे जीवनमान (LIFE Of EQUIPMENT) हे जास्त असेल

५ नं. चा मोठा तोटा म्हणजे वीज वितरण ला KVA डिमांड (वीज मागणी ) जास्त प्रमाणत करावी लागुन आनावश्यक खर्चात पडावे लागते .

advantages and disadvantages of power factor

या वरून असे समोर येते कि जर खराब पॉवर फॅक्टर असेल तर आपली वीज मागणी विनाकारण वाढेल व त्यासाठी वीज वितरण कपंनी ला भरावा लागणारी रक्कम सहाजिकच गरजे पेक्षा जास्त असेल (या मुळे इंडस्ट्री ला नाहक खर्चात पडावे लागेल ),जी कि जर पॉवर फॅक्टर चांगल्या प्रतीचा असेल तर योग्य तो खर्चच करावा लागेल व आर्थिक भूर्दंडा पासून मुक्तता होईल

Scroll to Top